आपल्या आयुष्यात प्रत्येक माणूस आपल्या आवडत्या क्षेत्राची निवड करतो.त्या क्षेत्रात अतिशय चांगल्या रितीने कसा रिझल्ट देता येईल.यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.प्रचंड मेहनत घेतो.अनं जिवाचं रान केल्यानंतर यश मिळवितो.विविधांग क्षेत्रात काम करणा-यांसाठी हिच मेहनत कामात येते.तस बघितलं तर राजकारण हे सामाजिक सेवेच मोठ माध्यम आहे.आपला प्रत्येक क्षण सामान्यांच्या सेवेसाठी अर्पण करण्याची भुमिका बाळगणारे व्यक्तीमत्व अनेकांच्या मनात घर करून जातात.राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार देवरावदादा भोंगळे यांची गेल्या पंचेवीस वर्षाची राजकारणातून सामाजिक हिताचा ध्यास घेणारी वाटचाल थक्क करून सोडणारी आहे.राजकारणातून मिळालेली सत्ता त्यांनी लोकसेवेसाठी खर्ची घातली.ग्रामपंचायत सदस्य,सरपंच,पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य,जि.प.चे अध्यक्ष ते राजुरा विधानसभा मतदारसंघातील आमदार हा त्यांचा प्रवास राजकारणात प्रामाणिकपणे काम करू बघणा-या तरूणाईंसाठी आॅयडाॅलच आहे.
आपल्या विकासाच्या व्हिजन ने जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या विकासाचा माॅडेल जगभर पोहचविला आहे.त्यांच्याच तालमीत तयार झालेले देवरावदादा ही आता विकासाची नवी परिभाषा मांडत आहेत.देवरावदादा कमालीचे संवेदनशिल आहेत.गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या खांदयाला खांदा मिळवून काम करतांना मला त्यांच्या या वेगळेपणाचे दर्शन झाले.
प्रश्न तरूणांचे असोत,महिलांच्याही समस्या किंबहूणा जेष्ठ नागरिकांना भेडसावणा-या विविध समस्या असोत.दादांनी या सर्व समस्यांना आपले माणून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.राजुरा विधानसभा मतदारसंघात ते चार वर्षापुर्वी आले.तेव्हा अनेकांनी त्यांची थटटा केली.राजु-यातील प्रस्थापित विरोधकांनी त्यांची दखल घेतली नाही.पण शेवटी काम बोलता हे.हे दादांनी सिध्द करून दाखवलय.राजुरा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात त्यांनी काम केलं.समाजातच्या सामान्यातल्या सामान्य नागरिकांना भेट देत त्यांनी त्यांचे प्रश्न समजून त्यावर कसा तोडगा काढता येईल याचे प्रभावीपणे नियोजन केले.राजुरा मतदारसंघातील गोंडपिपरी व जिवती हे तालुके प्रचंड दुर्लक्षित राहिलेेले.या तालुक्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम दादांनी केले.येणा-या काळात गोंडपिपरीत मोठमोठे उदयोगाचे जाळे निर्माण होणार आहेत.याचे श्रेय दादांचेच आहे.
राजकारण हे सामाजिक सेवेच अतिशय मोठ माध्यम आहे.हा नारा देत दादांनी आपले ध्येयधोरण स्पष्ट केले.यातूनच त्यांनी गावागावात अतिशय कमी काळात विकासाची नवी दालन सुरू केलीत.त्यांच्या विकासाचे व्हिजन अतिशय प्रभावी आहे.आपल्या विधनसभा मतदारसंघातील प्रश्न मांडतांना ते कधीच मागे पडले नाहीत.महिलांचे प्रभावी संघटन,युवकांची बांधणी,अंन जेष्ठांना आपलासा वाटणारे दादा आता आपल्या विकासकामांनी सर्वानाच आपलेसे वाटत आहेत.
आज आदरणीय आमदार देवरावदादा भोंगळे यांचा वाढदिवस आहे.त्यांना यानिमीत्ताने अनेकानेक शुभेच्छा.त्यांच्या विकासाचे हे कार्य आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणेची ज्योत पेटविणारे ठरेल.
दादा आपणास अनेकानेक शुभेच्छा…….!

दिपक सातपुते
तालुकाध्यक्ष
भारतीय जनता पार्टी,गोंडपिपरी




